
जिल्हा बँकेच्या तीन अधिकाऱ्यांवर सतीश सावंत यांचा प्रचार केल्याची पोलिसांत तक्रार
निवडणुकीमध्ये शासकीय पदाचा गैरवापर करून प्रचार केल्याप्रकरणी जिल्हा बँकेतील तीन अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा बँकेचे व्यवस्थापक आनंद आकाराम सावंत, विकास अधिकारी सुबोध तुकाराम कुडतरकर, चालक यशवंत सत्यविजय सावंत हे ब्रिझा गाडी नंबर एमएच- ०७ एबी- १४७० घेवून शिवसेनेचे उमेदवार जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा प्रचार करीत होते.
त्यांच्या गाडीत पंचक्रोशीतील भाजप व स्वाभिमानच्या ४५ कार्यकर्त्यांची नावे व मोबाईल नंबर आढळून आले. दुसऱ्या यादीत शिवसेनेच्या पाच पदाधिका-यांची नावे आहेत. तर गाडी सतीश सावंत यांच्या प्रचार साठी असल्याची नोंद आढळली आहे. त्यांच्या विरोधात वैभववाडी भाजपा तालुका प्रमुख राजेंद्र राणे यांनी भुईबावडा पोलिस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com