
महिलेशी अतिप्रसंग केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेलाच मारहाण
महिलेशी अतिप्रसंग केल्याचा जाब विचारण्यासाठी कुटुंबासमवेत गेलेल्या महिलेलाच बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी चिपळूण तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी चौघांविरोधात रविवारी अलोरे-शिरगांव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप भिकू शिर्के, संतोष भिकू शिर्के (सर्व-मुंढे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने पोलीस स्थानकात दिली. www.konkantoday.com