
संगमेश्वर तालुक्यातील गोवंश वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन
संगमेश्वर : तालुक्यातून इतरत्र अवैधपणे होणारी गोवंश वाहतूक वेळोवेळी संगमेश्वर पोलिसांकडे तक्रारी करूनही बंद होत नाही. ती त्वरित बंद करावी, अशा मागणीचे निवेदन माखजन परिसरातील नागरिकांच्यावतीने शिवसेनेचे युवा पदाधिकारी स्वप्नील बापट व सचिन चव्हाण यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे गोवंश बंदी असताना संगमेश्वर तालुक्यातून रात्री अपरात्री अवैधपणे व बेकायदेशीर गोवंश वाहतूक करण्यात येत आहे. संगमेश्वर तालुक्यात अनेकवेळा अशी होणारी वाहतूक अडवली आहे. तरीही संगमेश्वर पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असून, त्यावर कोणतीही कारवाई होत नाही असे का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच पोलिसांना निवेदन व तक्रारी करूनही हे प्रकार बंद होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अवैध गोवंश वाहतूक त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.




