
रत्नागिरीतील टीआरपी येथून दुचाकी लांबवली
रत्नागिरी : टीआरपी येथून दुचाकी लांबवली. गुरुवार 20 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली आहे. याबाबत प्रदीप रविंद्र रेवाळे (वय 28,रा.पांडवनगर टीआरपी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरुवारी रात्री त्यांनी दुचाकी (एमएच-08-एएल-3365) रुमबाहेर उभी केली होती. शुक्रवारी सकाळी त्यांना दुचाकी दिसून न आल्याने त्यांनी शोध घेतला व शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार पाटील करत आहेत.