दुरुस्तीसाठी दिलेल्या कारमधील ओरिजिनल पार्ट काढून घेतले गॅरेज मालकाविरोधात कार मालकाची तक्रार
खेड : दुरुस्तीसाठी दिलेल्या मारुती कारचे ओरिजिनल पार्ट काढून दुय्यम प्रतीचे पार्ट टाकून फसवणूक केल्याप्रकरणी गॅरेज चालक वसीम अब्दुल्ला तांबे यांच्या विरोधात खेड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील भरणा नाका येथील भारत एजन्सी मारूती ॲथोराईज सर्व्हिसिंग सेंटर वसीम अब्दुल्ला तांबे हे मालक आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या दादली चोचिंदे गावातील यतीन अनंत टमके यांनी ही तक्रार दाखल केली असून ही घटना 8 ऑगस्ट 2021 ते 13 डिसेंबर 2021 या मुदतीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की फिर्यादी यतीन टमके यांनी आपल्या मालकीची एमएच 06/VB 3737 या नंबरची कार दुरूस्ती करीता भारत एजन्सी गॅरेज मारूती ॲथेराईज सर्व्हिस सेंटर, भरणानाका, खेड येथे दिली होती. ही कार दुरुस्त करताना गॅरेज चालकाने गाडीतील ओरिजिनल पार्ट काढून त्या ठिकाणी द्य्य्यम प्रतीचे पार्टस बसवले असा फिर्यादी यांचा आरोप असून यामुळे फिर्यादी यांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
टमके यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार गॅरेजचे मालक वसीम तांबे यांच्यावर खेड पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
वाहतुकीला अडथळा होईल अशी कार उभी करणाऱ्या विरोधात गुन्हा
खेड : खेड शहरातील न्यायालयसमोर रस्त्यावर मधोमध कार उभी करून वाहतुकीस अडथळा आणि पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा वहीम ठेवून कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल अताऊल्ला चौगुले असे संशयित आरोपीचे नाव आहे.
साहिल चोगुले (२१) याने आपल्या ताब्यातील कार खेड-शिवतर रोडवर असलेल्या न्यायालयासमोर रस्त्याच्या मधोमध उभी केली होती. यामुळे अन्य गाडयांना अडथळा निर्माण झालाच शिवाय पादचाऱ्यांच्या जीविताशी धोका निर्माण झाला. त्यामुळे कार चालक साहिल चौगले राहणार केळशी ता दापोली याच्या विरोदहत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना दि 19 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई प्रियांका चंद्रकांत मोहीते यांनी येथील पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.