
प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित सिंधुदुर्गात!
पंचक या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित या सिंधुदुर्गात आल्या.सावंतवाडी व मळगाव परिसरात गेले काही दिवस सुरू असलेल्या पंचक या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ज्येष्ठ सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित या मळगाव मध्ये दाखल झाल्या. माधुरी दीक्षित मळगाव येथे आल्याची माहिती मिळताच त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. गेले काही दिवस मळगाव येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
www.konkantoday.com