रत्नागिरी मारुती मंदिर येथे वीज पडून नारळाच्या झाडाने घेतला पेट

0
153

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर जवळील नागरिकांनी विजेचे तांडव अनुभवले. आत्मबंधू आर्केड समोर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतला. ही घटना शुक्रवार 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 नंतर घडली. वीज पडल्यानंतर बाजूच्या नागरिकांनी तातडीने याबाबत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझवली. त्यामुळे हानी टळली. शुक्रवारी दुपारी 1 वा.पासून आकाश ढगांनी भरुन आल्यानंतर विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here