
टेंभ्ये येथे दहा हिस्सेदारांच्या केल्या खोट्या सह्या
रत्नागिरी : घराला संरक्षण भिंत बांधून मिळण्यासाठी टेंभ्ये ग्रामपंचायतीकडे 10 हिस्सेदारांच्या खोट्या सह्या करून फसवणूक करत समतीपत्र सादर केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजन जगन्नाथ नागवेकर (राहणार टेंभ्ये भोंडीवलेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात दीपक ज्ञानेश्वर आंबुलकर (वय 50, रा.टेंभ्ये भोंडीवलेवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना 8 मार्च ते 15 ऑक्टोबर 2022 या कालावधीत घडली आहे. त्यानुसार रंजन नागवेकरने 2013 मध्ये टेंभ्ये ग्रा. पं. कडे अर्ज केला होता. सेस फंडातून भिंत बांधण्यासाठी निधीही मंजूर झाला. संरक्षण भिंत बांधून मिळण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांमध्ये रंजन नागवेकरने दीपक आंबुलकर आणि त्यांचे मृत्यू झालेले काका रामचंद्र आंबुलकर यांच्यासह एकूण 10 हिस्सेदारांच्या खोट्या सह्या करून संमत्रीपत्र सादर करून फसवणूक केली होती. याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक करत आहेत.