हातखंबा येथे पोलिसांशी हुज्जत प्रकरणी माजी खासदार नीलेश राणेंसह 16 जणांची निर्दोष मुक्तता
रत्नागिरी : हातखंबा येथे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान गाड्यांची तपासणी पोलिसांकडून सुरू होती. यावेळी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्याशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह 16 जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हा खटला पहिल्यांदा मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरु होता. परंतु त्यानंतर हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. शनिवारी याबाबतचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिला. ही घटना लोकसभा निवडणुकीत 10 एप्रिल 2019 रोजी रात्री 12 वा. घडली होती. याप्रकरणी
नीलेश राणे, श्वेतांग वायंगणकर, सिद्धेश नेरकर, गौरांग खानविलकर, मयूर रावणाक, योगेश मांजरेकर, संदेश आरोंदेकर, सिद्धेश मालवणकर, चिनार मलुष्टे, अभिलाष कारेकर, सुभाष पवार, शुभम जोशी, गिरीष ओझा, नंदकिशोर चव्हाण, पराग पाटील अशी मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गणेश इंगळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी केला. त्यानुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.