
रत्नागिरीतील गाडीतळावरही मारुती मंदिरसारखे सुशोभिकरण
रत्नागिरी : शहरातील गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याशेजारी सुशोभिकरण काम सुरू झाले आहे. बंद असलेले काम तातडीने काम सुरू करण्याची मागणी शहर भाजपाकडून करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन रत्नागिरी नगर परिषदेला देण्यात आले होते. आता याठिकाणचे सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. येथील सुशोभिकरण पूर्ण झाल्यानंतर मारुती मंदिर प्रमाणेच या परिसरालाही शोभा येणार आहे. शहर सौंदर्यात भर पडणार आहे.