
राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित ४ महिन्यांच्या मानधनाचा विषय मार्गी लागणार.
राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित ४ महिन्यांच्या मानधनाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमीत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देर्वेद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.31) दिली.तसेच सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याच्या मागणीबाबतही राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.