भोस्ते घाटात अपघातांची मालिका सुरूच मंगळवारी एकाच दिवशी दोन अपघात

कंटेनर अपघातात मारुती कार चालक बालंबाल बचावला


खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अपघातांची मालिका अदयाप सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी या घाटात तासाभराच्या फरकाने दोन अपघात झाले. गतिरोधकामुळे झालेल्या कंटेनरच्या अपघात कंटेनरच्या मागे असलेला मारुती कारचा चालक केवळ त्याचे दैव बलवत्तर म्हणून बचावला. दोन्ही अपघातांमध्ये मनुष्यहानी टळली असली तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पहिला अपघात भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर झाला. घाट उत्ररणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो ट्रक अवघड वळणावर अनियंत्रित झाला आणि संरक्षक कठडयावर आदळला. या अपघातात क्लिनर जखमी झाला असून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुसऱ्या अपघात या अपघातापासून केवळ १०० मीटरवर असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे घडला. घाट उतरणाऱ्या टँकरने स्पीड ब्रेकरवर स्पीड कमी केला त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर चालकाला कंटेनर नियंत्रित करता न आल्याने कंटेनरची टँकरला मागून जोरात धडक दिली. ज्या टँकरला मागून धडक बसली तो टॅकर निघून गेला मात्र धडक जोरात असल्याने कंटेनरच्या चालकाची केबिन तुटून रस्त्यावर कलंडली. जेव्हा कंटेनरची टँकरला धडक बसली तेव्हा टँकरच्या बाजूने जाणाऱ्या मारुती कारला टँकर घासत गेला त्यामुळे मारुती कारचेही नुकसान झालें. सुदैवाने कंटेनर रस्तावर कलंडला नाही . या अपघातात बसलेल्या धक्क्यामुळे जर कंटेनर कलंडला असता तर मात्र मारुती कार चालकाचे वाचणे कठीण होते. मारुती कार चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून तो या जीवघेण्या अपघातातून सहीसलामत वाचला. कारमधून बाहेर आल्यावर चालकाने आकाशाकडे पाहून परमेश्वराचे आभार मानले.
मुंबई गोवा महामार्गावर दोन दिवसाआड होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. यामध्ये भोस्ते घाटाचेही चौपदरीकरण झाले. चौपदरीकरणामुळे अपघातांना आळा बसवा अशी अपेक्षा होती मात्र चौपदरीकरण झाल्यापासून अपघात कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. त्या अवघड वळणावर तर दर आठवड्याला एकतरी अपघात होऊ लागला आहे. चौपदरीकरणाचे काम करताना वळणावर तीव्र उतार ठेवण्यात आला असल्याने घाट उतरणाऱ्या जड वाहनांचा ताबा सुटून या ठिकाणी अपघात होत आहे चौपदरीकरणाच्या कामानंतर या वाळणवर किमान पन्नास अपघात झालेले आहेत. यामध्ये काही चालकांचा बळी गेला आहे तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत
या अवघड वळणावर होणारे अपघात रोखण्यसाठी बांधकाम विभागाकडून स्पीड ब्रेकर्स टाकण्यात आले. घाट उतरणाऱ्या वाहनांच्या वेग कमी व्हावा हा त्यामागील उद्देश होता मात्र स्पीड ब्रेकर्स आहे ते चालकाच्या लक्षात येण्यासाठी स्पीड ब्रेक्सच्या आधी सूचना फलक किंवा पांढरे पट्टे मारण्यात न आणल्याने अपघात रोखण्यासाठी बसविण्यात आलेले स्पीड ब्रेकर्सच अपघाताचे कारण होऊ लागले आहेत. घाटातील या स्पीड ब्रेकर्समुळे आता पर्यत अनेक अपघात झाले आहेत मात्र बान्धकाम विभागाकडून या कड़े सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते आहे.
मंगळवारी सायंकाळी भोस्ते घाटात कंटेनरच्या अपघात झाल्याची खबर कळताच येथील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ मदतीसाठी घाटात धाव घेतली. अपघातानंतर महामार्गवरील वाहतूक विस्कळीत झाली होती मदत ग्रुपचे सदस्य आणि पोलीस यांनी वन वे ट्राफिक सुरु करून वाहतूक सुरळीत केली दरम्यान क्रेन मागवून रस्त्यात कलंडलेला कंटेनर बाजूला करून महामार्ग वाहतुकीस खुला केला खेड पोलिसांनी अपघातांची नोंद केली असून खेड पोलीस तपास करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button