
संगमेश्वर स्थानकातील फलाटांच्या दुरवस्थेकडे कोंकण रेल्वेचे दुर्लक्ष
पत्रकार संदेश जिमन यांनी दाखवले भयावह वास्तव*
संगमेश्वर (प्रतिनिधी) ह्या जुलै महिन्यात कोकण रेल्वे चे अधिकारी यांनी संगमेश्वर रोड स्थानक फलाट क्र. दोन ची पाहणी करून केली. अनेक ठिकाण खचलेला फलाट तुटलेली फलाटाची कडा हे सर्व त्यांना दाखवले गेले त्यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले पण आज तागायत त्या कामाकडे कोणाचेही लक्ष्य नाही. काम जैसे ये अवस्थेत आहे. दिलेल्या आश्वासनाचे काय? आखासनाचे संगमेश्वर वासीय रेल्वे प्रवाशाचे काहीही ऐकायचे नाही असेच कोकण रेल्वे ने ठरविले आहे काय!.
दिवा सावंतवाडी पैसेंजर, मुंबई मडगाव मांडवी तुतारी एक्सप्रेस हया गाड्या फलाट क्रमांक दोन वर बुद्धतेक वेळा थांबतात. स्वतःच्या सामानासह फलाट क्रमांक दोन वर प्रवाश्याची लगबग सुरु असते अशा वेळी अपघात झाला. प्रवाशांचा पाय मोडला कोकण रेल्वे जबाबदारी घेणार का! का घ्या कारणासाठी सुद्धा आम्हाला आंदोलनाच्या आयुधाचा वापर करावा लागणार का? असा सवाल निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य ग्रुप चे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी विचारल आहे
