
पिंजर्यात अडकलेल्या उंदराने घेतला वृद्धाचा प्राण
घरात फिरत असलेला उंदीर पिंजर्यात सापडल्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गेलेल्या चिपळूण येथील एका वृद्धाचा नाल्यात पडून मृत्यू झाला. यातील चिपळूण शहरातील राहुल गार्डन राहणारे रमेश अनंत कापडी (७८) हे आपल्या घरात पिंजर्यात सापडलेला उंदीर टाकण्यासाठी राहुल गार्डनसमोरील डांबरी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये गेले असता त्यांचा तोल जावून ते पिंजर्यासकट नाल्यामध्ये पडले. त्यांच्या कपाळाला मोठी जखम होवून त्यातच त्यांचा मृत्यू झाला.www.konkantoday.com