गोव्यात दारुचे सेवन करणाऱ्यांना सुखरुप घरी पोहोचवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित बारमालकाची – गोव्याच्या मंत्र्यांचा सुचाेवाच
गोव्यात दारुचे सेवन करणाऱ्यांना सुखरुप घरी पोहोचवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित बारमालकाची आहे, असं वक्तव्य मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केलं आहे. यावर कायदेशीर तरतुदींची तपासणी करण्यासाठी आणि प्रभावी अमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचं गुदिन्हो यांनी म्हटलं आहे.गुदिन्होंच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.
गोव्यात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत असतात. यातील बहुतांश पर्यटक गोव्यात मद्य स्वस्त असल्यामुळे मद्यपान करुन वाहन चालवतात. गोव्यात सध्या अपघातांचं प्रमाण कमालीचं वाढलेलं आहे. या अपघातांना प्रामुख्याने ड्रंक अँड ड्राईव्ह हे कारण असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी आता या सगळ्याचा भार बारच्या मालकांवरच टाकण्याचं सूतोवाच केलं आहे. असं असलं तरीही गुदिन्होंच्या या मोहीमेला बार मालकांकडून सुरुंग लागण्याची शक्यता आहे. बार मालक याला विरोध करण्याची दाट शक्यता आहे.
www.konkantoday.com