डॉक्टर व्हायच्या आधी तिने स्वत:लाच संपवले! परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या जाकादेवीतील तरुणीची गळफासाने आत्महत्या

रत्नागिरी : एमबीबीएसच्या शिक्षणासाठी परदेशी जाणार्‍या तालुक्यातील जाकादेवी येथे तरुणीने घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वा. उघडकीस आली. सायली शशिकांत कांबळे (वय 20,रा. जाकादेवी खालगाव, रत्नागिरी) असे तिचेे नाव आहे. याबाबत तिचे वडील शशिकांत रामचंद्र कांबळे (वय 53, रा. जाकादेवी खालगाव, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. सायली एमबीबीएससाठी जॉर्जीयाला जाणार होती. 6 ऑक्टोबरला कोल्हापूर येथील विश्व संस्थेकडून शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे घेऊन व्हिजा मिळवण्यासाठी वरळीमधील ऑफिसला जाऊन ती दोघे शनिवारी सकाळी जाकादेवीला परतली होती. त्यानंतर सायली बेडरूममध्ये ओढणीने फॅनला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button