उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्यावतीने प्रभाग रत्न पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी : उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहरात नवा उपक्रम सुरू केला आहे. 1 ऑक्टोबर रोजी 30 जणांना प्रभाग रत्न पुरस्कार देऊन गौरव केला आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असणार्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे हा सोहळा पार पडला. या कार्यक्रम सोहळ्याला ज्येष्ठ उद्योजक रवींद्र सामंत, उद्योजक किरण सामंत, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, सतीश शेवडे, महेश म्हाप, बिपिन बंदरकर, राजन शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रभाग क्रमांक पाचमधील वकील, डॉक्टर, शिक्षक, क्रीडा शिक्षक, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, नाट्यक्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या 30 जणांचा प्रभाग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये शांताराम सावंत, प्रवीण मलुष्टे, शफी काझी, डॉ. कृष्णा पेवेकर, डॉ. शैलेंद्र भोळे, डॉ. श्रीनिवास कुंभारे, डॉ. नीलेश शिंदे, दत्तप्रसाद कुलकर्णी, सूचिता देसाई, श्रीकृष्ण दळी, समीर इंदुलकर, दीपक देसाई, प्रफुल्ल घाग, प्रदीप साळवी, के. एस. पोवार, शब्बीर बोरकर, प्रकाश जाधव, अॅड. विठ्ठल गद्रे, विपुल सुर्वे, रवींद्र साळवी, गौरव सावंत, गौरांग आगाशे, चंद्रशेखर जोशी, मंदार हेळेकर, सचिन वहाळकर, सुहास ठाकुरदेसाई, शाश्वत मानकर, सुनील शिवलकर, राकेश बेर्डे यांच्यासह मराठी पत्रकार परिषद आणि मराठी पत्रकार संघ या दोन पत्रकार संघटनांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात
आला.