राजापूर शहरातील विद्युत वाहिनी बनलेय धोकादायक

राजापूर : तालीमखान्याकडून जवाहर चौक राजापूर शहराकडे येणार्‍या मुख्य मार्गावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाजूलाच विद्युत वितरणची भूमिगत लाईन गेली आहे. तेथे बाजूलाच असलेल्या विद्युत डीपीला केबलने जोडण्यात आले असून सदर केबल भर रस्त्यावर आली आहे.दररोज या मार्गावरून वाहनांच्या वर्दळीसह वाहतूक कोंडी होत असते. अशावेळी या केबलला धक्का लागून ती तुटून धोका निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. यापूर्वी एकदा वाहनांची कोंडी झाली असता एका एसटी बसचा धक्का त्या केबलला लागला होता व त्याचे कव्हर उचकटले होते. भररस्त्यावर ती केबल आली असतानाच संबंधित विद्युत वितरण विभागासह स्थानिक प्रशासनाचे मात्र लक्ष नसल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्या केबलपासून असलेला धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. उघड्यावर आलेली ती केबल बाजूला करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहन चालकांतून करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button