
मंडणगडमध्ये अंगणवाड्यांच्या तांदळामध्ये भेसळ
मंडणगड : एकात्मिक बालविकास योजनेच्या अंतर्गत तालुक्यातील अंगणवाड्यांत मोफत वाटप करण्यात आलेल्या तांदळामध्ये प्लास्टिक सदृश तांदूळ आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, या करिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने प्रशासनाला निवेदन दिले.तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांची भेट घेण्यासाठी माजी तालुका अध्यक्ष राजेश गमरे, तालुका संघटक सुनील मोरे, तालुका अध्यक्ष राजन साळवी उपस्थित होते. तांदूळ खाण्यास अयोग्य आहेत. त्यामुळे लहान बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून जीवितास धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराची तत्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे