गरबा खेळताना मुलाचा मृत्यू ,बापानेही प्राण सोडले, विरार येथील दुर्दैवी घटना
गरबा खेळादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने ३५ वर्षांच्या मुलाला त्याचा वडिलांनी व भावाने रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, रुग्णालयाच्या दारातच त्या मुलाने अखेरचा श्वास घेतला.त्यानंतर आपल्या डोळ्या देखत मुलाने जीव सोडल्याचे पाहून धक्का बसलेल्या वडिलांनी काही क्षणातच प्राण सोडले. बाप लेकाचा एकाच रुग्णालायाच्या दारात मृत्यू झाल्याची ही ह्दयद्रावक घटना विरार येथे रविवारी (दि.२) सायंकाळी घडली. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव मनिषकुमार जैन तर त्याच्या वडिलांचे नाव नरपथ जैन असे आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विरार येथील अगरवाल कॉम्प्लेक्स मधील एव्हर शाईन अव्हेन्यू इमारतीत मनिष कुमार जैन यांचे कुटुंब राहते. मनिष कुमार जैन दागिन्यांचे व्यापारी आहेत. नवरात्र दरम्यान त्यांच्या इमारती खाली गरबा खेळवला जातो. मनिष कुमार जैन हे रविवारी रात्री गरबा खेळत होते. गरबा खेळत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यावेळी त्यांना उलटी देखील झाली. ते खेळ थांबवून घरी गेले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे पाहचाच त्यांचे वडिल नरपथ जैन आणि भाऊ राहूल यांनी रिक्षामधून त्यांना रुग्णालयात घेऊन गेले.
राहूल यांनी मनिषकुमार यांना रिक्षातून उतरवून रुग्णालयात घेऊन गेले. राहूल हे चौकशी विभागाजवळ जाऊन चौकशी करु लागले. मनिष यांचे वडिल नरपथ हे रिक्षाचे बील देण्यासाठी रिक्षातच थांबवले होते. तो पर्यंत मेडिकल काऊंटर जवळ उभारलेले मनिष कुमार हे खाली कोसळले. मनिष खाली कोसळताच त्यांच्या भावाने मदतीसाठी आरडाओरडा केला. हे सर्व चित्र रिक्षात बसलेले नरपथ जैन पहात होते. मुलगा धरणीला कोसळल्याचे पाहताच रिक्षात बसलेल्या नरपथ जैन यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका बसला आणि त्यांनी देखील आपले प्राण सोडले.
दोघांनीही रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषीत केले
www.konkantoday.com