सौरभ मलुष्टे याच्या राजकीय जडणघडणीत आवश्यक ती ताकद त्याच्यामागे उभी केली जाईल : ना. उदय सामंत

रत्नागिरी : सौरभ मलुष्टेने स्वच्छ मनाने समाजकारणाचा वसा हाती घेतला आहे. आता त्याचा राजकीय प्रवास सुरू होणार आहे. सामाजिक कार्याचा वसा घेऊन राजकारणात सुरुवात करणाऱ्या सौरभसोबत आम्ही मित्र म्हणून नेहमी राहू. वाढदिवसापूर्वीच सौरभवर शहर संघटक पदाची जबाबदारी सोपवत त्याला भेट देण्यात आली आहे. यापुढील राजकीय जडणघडणीत आवश्यक ताकद त्याच्या मागे उभी केली जाईल, असा शब्द राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्यामार्फत चित्रकला आणि काही सामाजिक उपक्रमांचे साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अण्णा सामंत, उद्योजक किरण सामंत, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बाबू म्हाप, वीरेंद्र वणजू, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, राजन शेट्ये, सतीश शेवडे, शिल्पा सुर्वे,निमेश नायर, विकास पाटील,वसंत पाटील, गणेश भिंगार्डे, मनोज साळवी, विजय खेडेकर, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. ना. उदय सामंत यांनी फोनवरून संवाद साधत सौरभ मलुष्टे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला कै. सुरेश उर्फ बाळशेठ मलुष्टे यांच्या स्मरणार्थ साळवी स्टॉप येथे उभारण्यात आलेल्या पाणपोई आणि जेष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या मोफत वाचनायलाचे उद्घाटन उद्योजक आण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी उद्योजक आण्णा सामंत यांनी सौरभ याला आशीर्वाद देण्याचा योगायोग जुळून आल्याची प्रतिक्रिया दिली. सत्कार केल्याने व्यक्तीला पुढील कार्य करायला प्रोत्साहन मिळते. सौरभ देखील यातून प्रोत्साहन घेऊन अधिक जोमाने काम करेल. ज्या उद्देशाने कार्य सौरभने हाती घेतले आहे, तो उद्देश नक्कीच सफल होणार असल्याचे उद्योजक आण्णा सामंत यांनी यावेळी सांगितले. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित म्हणाले, सोशल मीडियावर सौरभला दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा संदेशाचा अक्षरशः पाऊस पडला आहे. यातूनच सौरभ याची लोकप्रियता आणि त्याच्याबद्दलचे प्रेम दिसून येते. त्याने जी नाती जे मित्र जपलेत ते हेवा वाटण्यासारखेच आहेत. सौरभच्या मनातील इच्छा पूर्ण करायला आपल्या प्रत्येकाला काम करायचं आहे, असे राहुल पंडित म्हणाले. आपले मनोगत व्यक्त करताना सतीश शेवडे म्हणाले की, एक जिंदादील मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सौरभ. केवळ काही वर्षांच्या ओळखीत सौरभ अतिशय जवळचा मित्र होऊन गेला. पुढच्या वर्षी नगरसेवक म्हणून सौरभचा वाढ दिवस साजरा करूया असे शेवडे म्हणाले.
यापूर्वीही सौरभ मलुष्टे यांनी शेकडो सामाजिक उपक्रम राबवले आहे, साळवी स्टॉप येथे पाणपोई व मोफत वर्तमान पत्र वाचन कट्टा उभे करून त्यांनी एक वेगळा सामाजिक संदेश सर्वांना दिला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी उद्योजक किरण सामंत यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button