
खेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
खेड : शहरातील तीनबत्ती नाका येथील तळ्याचे वाकणार येथे शुक्रवार दि. 30 रोजी सायंकाळी 5.10 वाजता मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून 700 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे. यावेळी सिध्देश सुरेश माळी (वय 30 रा. कुवारसाई) याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी अस्मिता साळवी यांनी येथील पोलिसांत तक्रार दाखल केली. अधिक तपास सुरू आहे.