लम्पी आजार : मांडवे पंचक्रोशीतील 64 जनावरांना तातडीने लसीकरण
गुहागर : तालुक्यातील मांडवे येथे शुक्रवारी एका शेतकर्यांच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी रोग सदृश्य लक्षणे आढळून आली असून, त्या संशयित जनावराचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून या पंचक्रोशीतील 64 जनावरांना तातडीने लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यभरात शेतकर्यांच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी या चर्मरोगाने खळबळ उडवीली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप या रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला नसला तरी दि 21 रोजी खेड तालुक्यातील मांडवे डिकेवाडी या ठिकाणी डोईफोडे नामक शेतकर्यांच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी सदृश्य लक्षणे पशुसंवर्धन विभागाच्या तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.शुभांगी निंबोरे यांना आढळून आली आहेत. त्यामुळे तातडीने या पंचक्रोशीतील 64 जनावरांचे लसिकरण काल पूर्ण करण्यात आले आहे. शनिवारी सकाळपासूनच मांडवे, तळेसह आजुबाजूच्या पंचक्रोशीतील जनावरांची पहाणी करण्यात आली आहे. तसेच पंचक्रोशीतील सर्व गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करणे, फवारणी करणे, लसीकरण करणे अशा विविध बाबतीत स्थानिक ग्रामस्थांना पशुसंवर्धन विभागामार्फंत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ.विनया जंगले यांनी दिली.
सशंयित जनावरांचे रक्तांचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येत्या चार दिवसात आम्हाला प्राप्त होईल.