रिफायनरीसाठी ग्रामस्थांना पाहिजे ते पॅकेज देण्यास तयार
कोकणात प्रकल्प आला की त्याला विरोध होतो, अशी नकारात्मक मानसिकता उद्योजकांमध्ये पसरलेली आहे. ती पुसण्याची गरज आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबतही तसाच गैरसमज पसरवला जातोय. रिफायनरीबाबतची स्थानिकांच्या शंका दूर केल्या जातील. रिफायनरीला विरोध करणार नेमके कोण आहेत हे आता शोधल पाहिजे. रिफायनरी झाल्यास घराघरात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले. रिफायनरीसाठी ग्रामस्थांना पाहिजे ते पॅकेज देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.