मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषाकरून त्यांच्या लैकिकास बाधा आणत असल्यावरून डुप्लिकेटा विरूध्द कारवाई

0
72

राज्यातील मुख्यमंत्र्यांची डुप्लिकेट म्हणून वावरणार्या इसमाची पुणे पोलिसांकडून धरपकड सुरू असून, आंबेगावमधील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर, सांगलीमधील दुसऱ्या ‘डुप्लीकेट’ला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, तिसऱ्याचा शोध घेतला जात आहे. हे तिघे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून राज्यभरात मिरवत होते. तर, त्यांच्या लैकिकास बाधा आणत असल्यावरून पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

याप्रकरणी आंबेगावमधील विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) याच्यासह इतरांवर बंडागार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार माने आंबेगाव तालुक्यातील आहे. विजय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषाकरून फिरतो. नुकताच त्याचा व सराईत गुन्हेगार शरद मोहोळचा एकत्रित फोटो व्हायरल झाला. त्यात गुंड शरद मोहोळ खुर्चीवर बसलेला व त्या शेजारी विजय माने हा मुख्यमंत्र्यांची वेशभूषा करून उभारलेला दिसत आहे. तर, त्याशेजारी पोलीस देखील उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी या फोटोबाबत माहिती घेतली. त्यावेळी तो फोटो मुद्दाम व्हायरल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लैकिकास बाधा आणल्याचे दिसून आले. त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
त्यासोबतच सांगली येथील कवटेपिरा जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने स्पर्धा आयोजित केली होती. त्याठिकाणी तमाशा देखील ठेवण्यात आला होता. त्या तमाशात सांगलीतील डुप्लीकेट मुख्यमंत्री भिमराव माने याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी बेषभूषा केली होती. तर, तो या कार्यक्रमात नाचताना दिसून आला. त्याचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही माहिती देखील मिळताच पोलीस निरीक्षक बालाची पांढरे व त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अशाच प्रकारे आणखी एका डुप्लीकेट सीएमचा शोध पुणे पोलिस घेत आहेत. त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेषभूषाकरून डुप्लीकेट एकनाथ शिंदे मिरवत असल्याचे दिसत आहे. पण, हे डुप्लीकेट नाचगाण्यात अन गुंडासोबत वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढत आहेत. ते व्हायरलकरून मुख्यमंत्र्यांचे लैकिकास बाधा आणत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here