
आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेल्या त्या बॅनरची चर्चा
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्यानिमित्ताने रत्नागिरीत १६ सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील साळवी स्टॉप येथे तयारी सुरु आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर झळकले आहेत. ज्याठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे, त्याचठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे भले माेठे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, यातील एका बॅनरमुळे शहरात एकच चर्चा रंगू लागली आहे.
शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुकांत सावंत यांचा एका बॅनरवर फाेटाे लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचे फाेटाे छापण्यात आले आहेत. त्याचबराेबर सुकांत सावंत यांचा फाेटाे लावण्यात आला हाेता. सुकांत सावंत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख असले तरी सध्या त्यांना स्वप्नाली सावंत खून प्रकरणी मुख्य आराेपी म्हणून अटक करण्यात आली आहे.दरम्यान याची चर्चा सुरू झाल्यानंतर या बॅनरवरील हा फोटो हटवण्यात आला व तेथे दुसर्या पदाधिकाऱ्यांचा फोटो चिकटवण्यात आला
दरम्यान दुसर्या बॅनरवर स्वागतासाठी लावलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या फोटोंच्या गर्दीमध्ये शिंदे गटाच्या समर्थकांचे फोटो लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आम्ही सर्व सेनेत असल्याचे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा खुलासा शिंदे गटाच्या समर्थकांनी केला आहे. या शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सेनेकडून त्यापैकी एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर असणाऱ्या शिंदे समर्थकांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले. हा बॅनर सेनेकडूनच लावण्यात आल्याचा खुलासा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे. या बॅनरवर रोशन फाळके, विकास सावंत, वसंत पाटील, विकास पाटील, जितू शेट्ये आणि नायर यांचे फोटो आहेत; मात्र हे सर्वजण उदय सामंत समर्थक असल्याचा दावा रोशन फाळके यांनी केला आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौर्या बरोबरच सध्या बॅनरची चर्चादेखील जोरात आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी दहीहंडी कार्यक्रमात सामंत यांच्या स्वागतासाठी सामंत समर्थकांनी बॅनरवर शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचा फोटो लावण्यात आला होता त्यामुळे शिवसेनेने ही खेळी केली असल्याचे बोलले जात आहे
www.konkantoday.com
