
आबलोली विद्यार्थी वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू.
आबलोली : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यताप्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित, विद्यार्थी वसतिगृह आबलोली, तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या वसतिगृहामध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या गरीब, हुशार, गरजू व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन बाईत व अधीक्षक राकेश साळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आरक्षणाप्रमाणे वसतीगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, विशेष मागास वर्ग, आर्थिक मागास वर्ग तसेच अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह दोन पासपोर्ट साईज फोटो, मुलकी अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, मागील इयत्ता उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत व बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रांसह पालकांसोबत येऊन आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश मर्यादित असून, प्रवेशासाठी अधीक्षक राकेश साळवी (९४०५०७१५३१) यांच्याशी संपर्क साधावा.