
औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमरिक्त जागांवर 14 नोव्हेंबर रोजी समुपदेशाने प्रवेश प्रक्रिया
रत्नागिरी, दि. 11 ) :- प्रथम वर्ष औषधनिर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रमाकरिता संस्था स्तरावर रिक्त जागांवर प्रवेशासाठी 14 नोव्हेंबर 2025 रोजी समुपदेशनाने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असे प्र. प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन दि.मा.शिंदे यांनी कळविले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी कॅप किंवा नॉन कॅप प्रवेशासाठी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे असे सर्व विद्यार्थी या फेरीसाठी पात्र समजण्यात येतील. प्रवेश प्रक्रियेसाठी 14 नोव्हेंबर रोजी 11 वाजेपर्यंत संस्थेत येवून अर्ज करावा. त्यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करून त्याच दिवशी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रवेश फेरीकरीता उपलब्ध जागांवर शासन नियमानुसार प्रवेश त्याच दिवशी 14 नोव्हेंबर रोजी देण्यात येतील. नियमानुसार प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेश निश्चित करावा लागेल. विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क आवश्यक मूळ प्रमाणपत्रे, छायांकित प्रती सोबत आणावीत. रिक्त जागाचा तपशील www.gpratnagiri या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील पदविका विभागात मिळतील व तेथे स्विकारले जातील.




