आगामी दोन दिवस वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा

रत्नागिरी : अरबी सागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने आगामी  दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसाला जोरदार वार्‍याबरोबर सागरी उधाणाचीही साथ लाभण्याची शक्यता आहे. त्यामुळे सागरी मासेमारीसाठी मच्छिमारांनी जाऊ नये, असा सावधगिरीचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 18 सप्टेंबरपर्यंत वादळी वार्‍यासह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परतीचा पाऊस लांबणार असून पुढील आठवड्यात पुन्हा सक्रीय होणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचा प्रवास लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पाऊस कोकणात दीर्घकाळ रेंगाळणार सल्याचे संकेत  हवामान विभगाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button