जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे पर्यटन महोत्सव

रत्नागिरी : रत्नागिरी येथील स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यटनविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, रत्नागिरी आणि जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालयालय (DOT), कोकण विभाग, नवी मुंबई यांचेतर्फे दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायं. ४ वा. ‘जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजन करण्यात येत आहे.

‘पर्यटनाचा पुनर्विचार या संकल्पनेवर हा जागतिक पर्यटन दिन साजरा करणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिलेले असल्यामुळे तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रकिनारे, श्रीक्षेत्र गणपतीपुळेसारखे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ तसेच गड किल्ले, सहयाद्रीचे खोरे, कोकणातील आकर्षक धबधबे अशी पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक पर्यटन स्थळे रत्नागिरी जिल्हयामध्ये आहेत. देश-विदेशातून आता फार मोठया प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्हयामध्ये येत असतात. त्याचप्रमाणे येथे सोयी-सुविधा निर्माण होण्यासाठी, स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती व स्थानिक कलांना वाव देण्यासाठी आम्ही हा जागतिक पर्यटन दिन साजरा करणार आहोत.

रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा व स्थानिक स्तरावर व शासन स्तरावर वेगवेगळ्या सोयीसुविधेसाठी पर्यटन दिनातून मागण्या करण्यात येतात. तालुक्यातून येणाऱ्या मागण्या जिल्हा स्तरावरुन मंत्रालय स्तरावर जाऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येतो. तसेच अनेक सोयीसुविधा जिल्हयामध्ये आता निर्माण होत आहेत. शासनही पर्यटन विकासासाठी रत्नागिरी जिल्हयाकरिता वेगवेगळ्या योजना राबवित आहेत. संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे रत्नागिरी जिल्हयात पर्यटन चळवळ आता उभी राहत आहे. त्यामुळे नवनवीन पर्यटन व्यवसाय तयार होत असून व्यावसायिकांना अनेक मान्यवरांमुळे मार्गदर्शन मिळत आहे.

या परिषदेस उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, पर्यटन संचालनालय (DOT), कोकण विभागचे हणमंत हेडे, माजी आमदार बाळासाहेब माने व हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, संजय यादवराव, इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर श्री. सावंतदेसाई, र.जि.म.स. बँकचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, नदी पर्यटन महेश सानप विरेंद्र सावंत, पियुष बोंगीरवार, प्रफुल पेंडुरकर, दीपक जामदार, डॉ. चंद्रशेखर निमकर, पर्यटन समिती अध्यक्ष (कोकण विभाग) संतोष तावडे, मिलींद चाळके, पर्यटनतज्ञ, सारंग ओक, मीनल ओक, सुधीरभाई रिसबूड व जिल्ह्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. या वेळी पर्यटन क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

पर्यटक प्रेमी व नवीन तरुण व्यावसायिक, टुरिस्ट गाईड व जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क राजू भाटलेकर- मोबा. नं. ९१३०३८३६६६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button