शिवसेनेच्या चिन्हावर आणि वाघावर अधिकार गाजवण्याचा गद्दारांचा खेळ संपत आलाय : खासदार विनायक राऊत यांची टीका
चिपळूण : शिवसेनेतील 40 गद्दार आमदारांनी बंड केले. त्यांनी हिंमत असेल आताच राजीनामा देऊन मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. शिवसेनेच्या नावावर, चिन्हावर आणि वाघावर अधिकार गाजवायचा प्रयत्न गद्दार गटाकडून सुरू आहे. गद्दारांचा हा औटघटकेचा खेळ आता संपत आला आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. चिपळूण येथे ते बोलत होते. यावेळी खा. राऊत म्हणाले,
सर्वोच्च न्यायालयात देखील यांनी पलटी घेतली आहे. पुढील निवडणुकीपर्यंत धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात असलेली याचिका निवडणूक आयोगाकडे पाठवा, अशी उडी मारली आहे. विविध कारणे सांगून निवडणुका पुढे ढकलण्याचे पळपुटे धोरण त्यांनी स्वीकारले आहे, असेही खा. राऊत म्हणाले.