
तळे येथून सोन्याच्या नेकलेसची चोरी
खेड : तालुक्यातील तळे जांभुळवाडी येथे चोरट्याने घरात ठेवलेले सुमारे 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस चोरून नेले आहे. दि.23 मार्च रोजी दुपारी 3.30 ते दि.24 एप्रिल रोजी सकाळी 7 वा. च्या मुदतीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हरिश्चंद्र बाबाजी मोरे (वय 76, सध्या रा. सह्याद्रीनगर,पुणे 43; मूळ रा. तळे जांभूळवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार जांभूळवाडी येथील घरातील हॉलमध्ये त्यांच्या पत्नीने पर्समध्ये ठेवलेला सुमारे 75 हजार रुपये किमतीचा तीन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.