गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिसांनी घेतली होती कडी मेहनत,कायद्याबरोबर माणुसकीचेही दर्शन

यंदा आलेला गणेशोत्सव कोकणवासीयांची खास होता. भयमुक्त वातावरणात कोकणवासीयां नी सुरक्षितरित्या गणेशोत्सव साजरा करावा यासाठी रत्नागिरी पोलिसांनीही चोख नियोजन केले होते.त्यामुळेच यंदा कोठेही या काळात या अनुचित प्रकार घडले नाहीत.

रत्नागिरी पोलिसांनी गणेशात्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यांत अवैध धंद्यावर मोठी कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे एकूण 69 केसेस करण्यात आलेल्या असून 4 लाख 6 हजार 140 रुपयांची 2 हजार 106 लिटर दारु जप्त करण्यात आली. तसेच महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्याप्रमाणे 18 केसेेस करण्यात आलेल्या असून रोख 2 लाख 94 हजार 566 रुपये जप्त्ा करण्यात आले.

तसेच या उत्सवाचा फायदा घेऊन कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यात उपद्रव ठरु शकणार्‍या व्यक्तींविरुध्दही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.यामध्ये कलम 107 नुसार 127 जणांवर,कलम 149 नुसार 332 जणांवर आणि कलम 93 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम नुसार 24 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.या व्यतिरिक्त विशेष कार्यकारी दंडाधिकारी,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून शांतता राखण्यासाठी कलम 107 नुसार 45 अंतरिम बंधपत्रे आणि 29 अंतीम बंधपत्रे घेण्यात आली.त्याचप्रमाणे सामाजिक सलोखा राखण्यासाठी 536 गावांना ग्रामभेट व तेथे स्थानिकन गरिकांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. गणेशोस्तव शांततेत पार पाडण्यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यांतील 55 पोलीस अधिकारी व 393 पोलीस अंमलदार, 2 दंगल नियंत्रण पथक व 1 क्युआरटी असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता. या पोलीस दलाव्यतिरिक्त (1) महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथुन 10 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, (2) पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथून 50 नवप्रविष्ठ पुरुष व (3) पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, सांगली येथून 25 नवप्रविष्ठ महिला पोलीस अंमलदार, (4) राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2, पुणे येथून 2 प्लाटून्स, रत्नागिरी जिल्हयातील जिल्हयातील गृहरक्षक दलाचे 294 जवान असा अतिरिक्त बंदोबस्त प्राप्त झालेला होता.

या उत्सवानिमीत्त नेहमी प्रमाणे मुंबई व अन्य शहरांत, गावांत असलेले कोकणातील मुळ रहीवासी हे रत्नागिरी जिल्ह्यांत रायगड, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातुन प्रवेश करतात. या पैकी रायगड मधुन येणार्‍या भाविकांचे जास्त प्रमाण असल्याने, भाविकांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (मुंबई ते गोवा) या महामार्गावर आंबा पाँईट, कशेडी, खेड, ते राजापूर एसटी डेपो पर्यंत तात्पुरत्या स्वरुपातील एकुण 20 पोलीस मदत चौक्या/राहुट्या राष्ट्रीय महामार्ग आस्थापना यांच्याशी समन्वय राखुन त्यांच्या सहकार्याने उभारण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पोलीस विभागाकडून 8 अधिकारी, 72 अंमलदार बंदोबस्ताकरीता नेमण्यात आलेले होते. रत्नागिरीत येणाया चाकरमान्यांचा प्रवासाचा थकवा येऊ नये यासाठी, जेणेकरुन संभाव्य अपघात टाळण्याचा दृष्टीकोनातून राहुट्यांमध्ये भाविकांना विनाशुल्क चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.वरील सर्व नियोजनामुळे व पोलीस दलातील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे प्रयत्न व रत्नागिरीवासीयांच्या सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव सण कोणताही कायदा व सुव्यवस्थेच्या समस्येविना शांततेत पार पडलेला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button