
रत्नागिरी शहरात घडले दुचाकीचे अपघात
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरासह परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले.
रत्नागिरी शहरानजिकच्या कुर्ली फाटा येथे जावेद अब्दुल लतीफ वस्ता (४०) यांची दुचाकी घसरल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. दुसर्या घटनेत पाऊस पडल्याने कविता गजानन चव्हाण (४३) या गाडीवरून पडल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. या दोन्ही अपघातांची नोंद जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.