वेळास समुद्र किनार्यावर नुकतीच सागरी किनारा स्वच्छता मोहीम
मंडणगड : सागरी किनारी स्वच्छता मोहीम या मोहिमेच्या माध्यमातून वेळास ग्रामस्थ, पंचायत समिती मंडणगड, तहसील कार्यालय मंडणगड यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून वेळास समुद्र किनार्यावर नुकतीच सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेत तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी सुर्वणा बागल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी विशाल जाधव, मंडळ अधिकारी प्रविण मोरे, जितेंद्र साळवी, रुपेश मर्चंडे, समिधा सापटे ग्रामसेवक नाडेकर, यांच्यासह अधिकारी वर्ग ग्रामस्थ व वेळास जि.प. शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी सर्वांनी श्रमदान करत किनार्यावरील पडलेले प्लास्टिक प्लास्टिक बाटल्या, उधाणाने आलेला कचरा गोळा करुन समुुद्र किनारा स्वच्छ केला. यामुळे येथील समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर दिसू लागला आहे.