तुमच्या ऑफीसमध्ये किंवा कार्यालयात तुमचं काम सोडून तुम्हाला जर कुणी अगदी दररोज इतर कामं सांगत असेल तर तुम्ही काय कराल? आणि ही ‘इतर’ कामं म्हणजे शासन निर्णय, उपक्रम, अभियान, प्रशिक्षण, सर्वेक्षणं अगदी गुरं मोजण्यापासून ते शौचालय स्वच्छतेची जबाबदारी घेण्यापर्यंत साधारण 100 एक कामं असतील तर तुम्ही तुमच्या कामाला 100 टक्के न्याय देऊ शकाल का?या ‘इतर’ कामांच्या धबाडग्यात हजारो मुलांच्या ‘भविष्याशी तडजोड’ करावी लागत असेल तर? हीच परिस्थिती आज महाराष्ट्रातील शिक्षकांची आहे.
राज्य सरकारने नुकतेच शाळांच्या वर्गखोलीत शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश दिलेत. पण शिक्षकांना वर्गात हजर राहता येत नसेल किंवा वर्गात असूनही शिकवायचं सोडून इतर कामं करावी लागत असतील तर शिक्षकांचा ‘तो’ फोटो विद्यार्थ्यांना शिकवणार आहे का? असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे
www.konkantoday.com