करबुडे येथे जुगार खेळणार्या 11 जणांविरोधात गुन्हा
रत्नागिरी : करबुडे गाववाडी येथे जुगार खेळणार्या 11 जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी दुपारी 1.15 वा.करण्यात आली असून 43 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कृष्णा तांबे (वय 58),गंगाराम तांबे (वय 65),समीर कळंबटे ( वय 39), भिकू सोनवडकर (वय 41),रविंद्र कळंबटे (वय 39,सर्व रा. मूळगाववाडी करबुडे, रत्नागिरी), विजय नेवरेकर (41,रा.काजरेकोंड करबुडे,रत्नागिरी),अनिल कळंबटे (41),धोंडू सोनवडकर (70),मंगेश सोनवडकर (36),बंडू तांबे (37),शांताराम सोनवडकर (43, सर्व रा.मुळगाववाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल विनायक राजवैद्य यांनी तक्रार दिली आहे. हे सर्व जण जुगार खेळ खेळत असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल जोशी करत आहेत.