पाली बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : तालुक्यातील पाली बाजारपेठेत बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्‍याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा.करण्यात आली असून 5 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. समीर सुहास सावंतदेसाई (48, रा.चौसोपीवाडी खेडशी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हवालदार अरूण चाळके यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी समीर पाली एसटी स्टँड समोरील दुकानालगतच्या गल्लीत बेकायदा जुगार खेळ खेळत असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button