
पावस धनगरवाडी ग्रामस्थांचा उदय सामंत यांना जाहीर पाठिंबा
उदय सामंत यांची भेट घेत पावस धनगरवाडी ग्रामस्थांनी दिला जाहीर पाठिंबा रत्नागिरी, पावस धनगरवाडी ग्रामस्थांनी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेत पाठिंबा जाहीर केला. उदय सामंत यांच्या पुढाकाराने होत असलेल्या रत्नागिरी आणि पावस गावाच्या विकास पाहत या गावातील ग्रामस्थांनी सदिच्छा भेट देत पाठिंबा दर्शविला. यावेळी रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा प्रचार करून संपूर्ण मतदारसंघात जास्तीत जास्त मताधिक्याने उदय सामंत यांना विजयी करण्याचा निर्धार पावस धनगरवाडीतील ग्रामस्थांनी केला. यावेळी अनंत आखाडे, कृष्णा भोजे, संतोष आखाडे, विक्रम झोरे, अक्षय सलपे, रवींद्र झोरे, मनोज चौगुले, मिलिंद चौगुले, आर्यन भोजे, विलास आखाडे, स्वराज आखाडे, शुभाष आखाडे, राहुल झोरे, आदेश आखाडे, शुभम आखाडे, सुजल आखाडे, लौकिक आखाडे, भौतिक आखाडे, शांताराम आखाडे, आयुष झोरे, सौरभ आखाडे, साहिल आखाडे, अमित सलपे, तुकाराम आखाडे, लक्ष्मण भोजे, दिशान भोजे, लक्ष्मण झोरे, सोनू झोरे उपस्थित होते.