
संगमेश्वर-कसबा येथे छ. संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व संग्रहालय उभारावे, आ. शेखर निकम यांची मागणी.
महापराक्रमी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संगमेश्वर-कसबा या ऐतिहासिक ठिकाणी लवकरात लवकर जागतिक दर्जाचे स्मारक व संग्रहालय उभे करावे, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री ना. शंभूराजे देसाई, राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीला या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावरून संगमेश्वर-कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक तसेच संग्रहालय उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबत चिपळूण-संगमेश्वरवासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.www.konkantoday.com