गणपतीपुळे येथील गणरायाचे भाविकांनी घेतले पदस्पर्श दर्शन
गणपतीपुळे : भाद्रपद चतुर्थीला गणपतीपुळे येथील प्रसिद्ध देवस्थानाच्या गाभार्यात जाऊन गणरायाच्या चरणाशी स्पर्श करून दर्शन घेण्याची परंपरा आहे. यंदाही ही परंपरा जोपासण्यात आली.
गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीपुळ्यात भाविकांसाठी इथला गाभारा खुला केला जातो. वर्षातून एकदाच श्रींचा पदस्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी पहाटेपासून या ठिकाणी गर्दी केली. मालगुंड, नेवरे, गणपतीपुळे, भंडारपुळे आणि निवेंडी या ठिकाणचे ग्रामस्थ श्रींच्या दर्शनासाठी आले होते.