वेडसर व्यक्तीने केलेल्या फोनमुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांची विनाकारण धावपळ
रायगड जिल्हय़ात बेवारस स्थितीत शस्त्र असलेली बोट सापडल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क आहे त्यातच पोलिस कंट्रोल रूमला आलेल्या एका फोनमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांची धावपळ उडाली
सावंतवाडी रेल्वेस्थानकावर एक पांढरे कपडे घातलेली व्यक्ती हातात बंदूक व बाॅम्ब घेऊन वास्को द पाटणा या रेल्वे गाडीत चढल्याची फाेन सिंधुदुर्गातील कंट्रोल रुमच्या ‘डायल ११२’ वर आला आणि पाेलिसांची धावपळ उडाली.
वास्काे द पाटणा गाडी शस्त्रधारी व्यक्ती चढल्याचे कळताच सावंतवाडी पाेलिसांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. मात्र, सावंतवाडीतून ही गाडी सुटल्याने रत्नागिरी पाेलिसांना माहिती देण्यात आली. रत्नागिरीतील ११ पाेलीस अधिकारी, ४८ अंमलदार, रेल्वे पोलीस अधिकारी ३ व ८ अंमलदार आणि बाॅम्ब शोधनाशक पथकाची टीम मध्यरात्री रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पाेहाेचली. गाडी रेल्वे स्थानकात येताच संपूर्ण रेल्वेची कसून तपासण्यात करण्यात आली. तब्बल ३८ मिनिटे ही रेल्वे तपासल्यानंतर काहीच हाती लागले नाही. तसेच सिंधुदुर्ग पोलिसांनी दिलेल्या वर्णनाची व्यक्तीही पोलिसांना दिसली नाही. त्यामुळे पाेलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
त्यानंतर पोलिसांनी त्या काॅलची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी फाेन करणारी व्यक्ती वेडसर असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com