भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज दापोलीत दाखल , मात्र साई रिसॉर्टवर धडक मारली नाही

शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर कारवाई प्रशासनाने करावी यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज दापोलीत दाखल झाले.साई रिसॉर्टवर तोडावे व कारवाई करावी या मागणीसाठी सोमय्या रिसॉर्टवर धडक मारणार होते. मात्र, त्यापूर्वीच मुरुड ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाल्याने सोमय्या यांनी रिसॉर्टवर जाणार नसल्याचे जाहीर केले. त्याऐवजी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पाडलेला बंगला पाहणार जाणार असल्याचे सोमय्यांनी जाहीर केले.

रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या यांनी आज दापोली गाठले. सोमय्या यांनी खेड ते दापोली असा पायी दौराही काढला. काही ठिकाणी त्यांनी चौकसभांमध्ये भाषणे करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.

रिसॉर्टवर तोडत कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमय्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्र्यांनी रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले असले तरी प्रशासनात उद्धव ठाकरे यांची माणसे आहेत. त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याचा आरोप सोमय्यांनी केला. रिसॉर्ट असलेल्या मुरुड ग्रामपंचायतीत सोमय्या यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाले असल्याचे सोमय्यांनी म्हटले. तोडक कारवाईसाठी प्रतिकात्मक हातोडा ग्रामपंचायतीला देणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर आपण साई रिसॉर्टवर जाणार नसून मिलिंद नार्वेकर यांनी पाडलेला बंगला पाहण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button