
रत्नागिरी जिल्ह्यात कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का
चिपळूण तालुक्यात कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री ९ वाजता भूकंपाच्या सौम्य धक्क्याची नोंद झाली. मात्र याचे धक्के थेट कोयनेसह चिपळूण तालुक्यातील पोफळी, अलोरे परिसरात चांगलेच जाणवले. भूकंप मापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेल्याची माहिती कोयना भूकंप प्रशासनाने दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोर्यात हेळवाक गावच्या नैऋत्येला ३ किलोमीटर आणि कोयना धरणापासून ४ किलोमीटर अंतरावर असून या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली ५ किलोमीटर इतकी नोंद झाली आहे. दरम्यान, कोयना धरणात १०३.९५ टीएमसी पाणीसाठा आहे, तर या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका झाला नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापना कडून देण्यात आली. पोफळी, अलोरे परिसरात सोमवारी रात्री भूकंपाचे धक्के चांगलेच जाणवले. मात्र यामध्ये कोठेही नुकसान झाल्याची नोंद नाही.www.konkantoday.com




