
कोकणभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कृषी उद्योजकांसाठी २४ पासून कोकण अभ्यास दौरा
कोकणभूमी प्रतिष्ठान ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून कोकणातील कृषी प्रकल्पाचा अभ्यास दौरा शुक्रवार २४ मे ते रविवार २६ मे २०२४ दरम्यान श्रीवर्धन गुहागर, दपोली आदी परिसरात अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील कृषी प्रकल्पाच्या अभ्यास दौर्यातून ज्या ज्या कोकणवासियांच्या कोकणात जमिनी आहेत किंवा ज्या कोकणवासिय यांना कोकणात गुंतवणूक करून प्रकल्प उभारायचे आहेत अशांसाठी दरमहा कोकणाती कृषी प्रकल्पांचा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. अशा यशस्वी आयोजकांकडून या प्रकल्पाची माहिती, त्याच्यासाठी लागणारी गुंतवणूक, त्याचे अर्थशास्त्र, त्याचे अनुभव हे सर्व समजून घेता येईल. या अभ्यास दौर्यात डॉक्टर चंद्रकांत मोकल, विनायक महाजन, अरविंद अमृते, महादेव महाजन, धनंजय जाधव व यशस्वी शेतकरी तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.www.konkantoday.com