साखरपा येथे महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आरोग्य विभागाला धरले धारेवर
संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बुधवारी रात्री उर्मिला बेर्डे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप करत नातेवाईक, जय शिवराय मित्रमंडळ, स्थानिक ग्रामस्थ यांनी आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी शॅरोन सोनवणे यांनी आक्रमक झालेल्या नागरिकांची भूमिका समजून घेतली. दवाखान्यातून मिळालेल्या अपुर्या सुविधा, अकार्यक्षम डॉक्टर हेच मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप करत नातेवाईक नयन शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जय शिवराय मित्र मंडळाचे लक्ष्मण कदम, सिद्धू पावसकर, भरत माने, केतन दुधाणे, कुणाल शिंदे, स्वप्नील कदम, वैभव भोसले, सागर तांदळे, मनू चव्हाण, सागर शिंदे, प्रसाद कोलते, जगदीश गांधी, पथू शेडगे, दामू शिंदे आदी कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते. याप्रसंगी सभापती व मंडळाचे सदस्य जया माने यांनी देखील आक्रमक होत ताबडतोब यावर निर्णय घ्यावा, अशी भूमिका
घेतली.