
तळ कोकणातील किनारपट्टीवर ३०३ समुद्री जीवांचे अस्तित्व अभ्यासात माहिती उघड
रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तळकोकणातील दोन जिल्ह्यातील किनारपट्टी भागात रॉकी टाईड पूल परिसंस्थेतील प्राणीसृष्टीचे दस्तावेजीकरण प्रकल्पांतर्गत झालेल्या अभ्यासात ३०३ समुद्री जीव आढळले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील काटघर, हेदवी, खारवीवाडा, वेळास आणि वेळणेश्वर अशा पाच तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग कुणकेश्वर आणि भोगावे या तीन ठिकाणी समुद्री जीव आढळले आहेत.मँग्रोव्ह अँड मरीन बायोडायव्हासटी कन्झर्वेशन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने सलिम अली संटर फॉर ऑथनोलॉजी ऍण्ड नॅचरल हिस्टरी (सिकॉन) या संस्थेस स्मॉल अँटस प्रोग्राम अंतर्गत या अभ्यासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागातील रॉकी टाईड पूलच्या परिसंस्थेतील प्राणीसृष्टीचे दस्तावेजीकरण या अभ्यास प्रकल्पाचे नेतृत्व गोल्डिन क्वाड्रोस शिरीष मांची आणि सिद्धेश भावे यांनी केली आहे. www.konkantoday.com