
चिपळूण शहरातील विवाहिता बेपत्ता
चिपळूण ः शहरातील भेंडीनाका येथील वीणा गणेश गांधी (वय 27) ही विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार पती गणेश गांधी यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी वीणा ही सकाळी 7:30 वा. भेंडीनाका येथील घरातून नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता त्या न सापडल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार गांधी कुटुंबीयांनी दिली. गेले काही दिवस त्यांचा शोध लागला नसल्याने चिपळूण पोलिसांनी विवाहित गांधी या बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस आशिष बल्लाळ करीत आहेत.