खेर्डीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अनिल फाळके बिनविरोध
चिपळूण : तालुक्यात खेर्डी ग्रा. पं. च्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अनिल फाळके यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी फाळके यांच्यासह तिघेजण इच्छुक होते. दोघांनी माघार घेतल्याने फाळके यांची एकमताने निवड करण्यात आली. खेर्डी ग्रा. पं. ची सोमवारी ग्रामसभा झाली. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्षपदी युसुफ बेबल, विजय घाणेकर व अनिल फाळके तिघेही इच्छुक होते. अखेर चर्चा करून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, सरपंच अपर्णा दाते, उपसरपंच विनोद भुरण, मंगेश लंकेश्री, सतीश शिंदे, सुनील मेस्त्री, आप्पा मेस्त्री, माजी सरपंच प्रकाश पाथरवट, बाबू शिर्के, अभिजित खताते, रवींद्र फाळके, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे, तलाठी मधुरा कदम, सुनील गुरव, अनिल लांजेकर, संदेश मोहिते, ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया उतेकर, अभिजित खताते आदींनी अभिनंदन केले.