आपल्यावर खालच्या पातळीवर झालेल्या टीकेला आपण २०२४ मध्ये चोख उत्तर देऊ -मंत्री उदय सामंत यांचा खणखणीत इशारा
शिवसेनेनेतील मतभेद मिटावेत यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न केले होते
परंतु पक्ष नेतृत्व भोवती असलेल्या लोकांचा तर शिवसेना जोडण्यापेक्षा तोडण्याकडेच होता त्यामुळे आपण शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला लोकशाहीमध्ये एखादे मत पटले नाही तर लोकशाही मार्गाने उत्तर द्यायचे असते परंतु आपल्यावर झालेल्या हल्ला व आपल्या आईवडिलांवर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली या सर्वाना आपण योग्यवेळी उत्तर देऊ असा सज्जड इशारा मंत्री उदय सामंत यांनी काल दहीहंडी कार्यक्रमात बोलताना दिला
पुण्यातील एका कार्यक्रमासाठी मंत्री उदय सामंत हे मार्गस्थ होत असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती.आता या घटनेला काही दिवसांचा कालावधी लोटला असली तरी त्याची सल मात्र, सामंताच्या मनात कायम घर करुन राहिलेली आहे. त्यामुळेच दहीहंडीच्या दिवशी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवला. येत्या 15 दिवसांमध्ये ज्या ठिकाणी आपल्यावर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी एकटा जाऊन सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर ज्यांच्यामध्ये दम आहे त्यांनी आपल्या केसालाही धक्का लावून दाखवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
रत्नागिरी येथील दहीहंडी कार्यक्रमात उदय सामंत यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे.
दरम्यानच्या काळात आपल्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे.माझे आई वडिलांवरही टीका करण्यात आली आहे आपण त्यावेळी उत्तर दिले नसले तरी सर्वकाही आपल्या डोक्यात आहे. त्यामुळे एप्रिल 2024 ला सर्वांनाच उत्तरे देणार आहे. जर त्यावेळी मी उत्तर दिले नाहीतर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे मधल्या काळात ज्याप्रमाणे टीका झाली त्या सर्वाचायोग्यवेळी बदला घेणार असल्याचेच सामंत यांनी दहीहंडी कार्यक्रमात बोलून दाखविले आहे. शिवाय 2024 च्या निवडणुकीनंतर उत्तर देणार असे म्हणत त्यांनी विनायक राऊत यांनाच एकप्रकारे इशारा दिला आहे.
www.konkantoday.com